आईला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, जखमी आईची विष पिऊन आत्महत्या.

58

आईला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, जखमी आईची विष पिऊन आत्महत्या.

तुटोकोरिन:- संपत्तीची वाटणी करण्यासाठी आई तयार होत नसल्याने दोन नराधम मुलांनी त्यांच्या आईला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या बिचाऱ्या आईने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील तुटीकोरिन येथे घडली आहे.

गननकारी असे त्या आईचे नाव असून ती तिचा पती मायापेरुमा व दोन विवाहित मुलगे सेल्वाकुमार 35 व मुथुराज 37 यांच्यासोबत तुटोकोरिन येथे राहायची. या दाम्पत्याच्या मुलांनी त्यांना संपत्तीचा वाटा करण्यास सांगितले होते. यावरून त्यांच्यात व मुलांमध्ये भांडणं व्हायची. गननकारी यांनी त्यांना आमच्या मृत्यूनंतर संपत्तीची वाटणी करा असे सांगितले होते. मात्र मुलं ऐकायला तयार नव्हती. त्यावरून 24 नोव्हेंबरला त्यांच्यात मोठे भांडण झाले. त्यानंतर त्या दोन्ही मुलांनी आईला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी गननकारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी तिच्या दोन्ही मुलांवर गुन्हा देखील दाखल झाला.

मात्र रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर गननकारीने विष पिऊन आत्महत्या केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी गननकारीच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे.