मुंबई 23 वर्षीय तरूणीची मुंबई पोलिस दलातील PSI विरूद्ध बलात्काराची तक्रार.
मुंबई:- मध्ये एका महिलेने पोलिस सब इंस्पेक्टर वर बलात्काराचे आरोप लावत तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. तक्रार मुंबई पोलिस दलातील एका इन्स्पेक्टर विरुद्ध एमआरए मार्ग पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्त्या तरूणीने पोलिस सब इंस्पेक्टर सोबत सोशल मीडीयाच्या माध्यमातून ओळख झाल्याचं म्हटलं आहे.
23 वर्षीय तक्रारदार तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस सब इंस्पेक्टर सोबत तिची ओळख सोशल मीडियात फेसबूक द्वारा झाली. पुढे त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचेही प्रॉमिस दिले होते. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात त्याने तरूणीला दक्षिण मुंबईमध्ये एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. पुढे लग्नाचं वचनदेखील मोडलं. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी शहाजी उमप यांनी दिली आहे.
दरम्यान तक्रारदार तरूणी ही गोरेगावची रहिवासी आहे. तिची सध्या वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदार तरूणीच्या माहितीनुसार संबंधित तपास यंत्रणा बलात्काराचे आरोप असलेल्या पोलिस सब इंस्पेक्टरच्या अकाऊंटची तपासणी करत आहेत.