सांगली महिलेने नांदेडच्या अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण.

56

सांगली महिलेने नांदेडच्या अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण.

सांगली :- अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियावरून ओळख वाढवत त्याला नांदेडहून सांगलीत बोलावून घेत त्याचे एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी माधवनगर येथील महिलेविरोधात पीडित मुलाच्या वडिलांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुलै 2019 मध्ये नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून माधवनगर येथील महिलेची ओळख झाली होती. संबंधित महिला या मुलाशी ओळख वाढवत, त्याला जाळ्यात ओढत माधवनगरला येण्याची वारंवार विनंती करत होती. त्या मुलाने माधवनगरला येण्यास नकार दिल्यानंतर, संशयित महिलेने जीव देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पीडित मुलगा तिला भेटण्यासाठी माधवनगर येथे आला होता. त्यावेळी महिलेने त्याचे जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. त्यानंतरही दोनवेळा असाच प्रकार घडल्यानंतर त्याने याची माहिती स्वत:च्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे वडील माधवनगरला आले, मात्र या महिलेने मुलाच्या वडिलांवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर अधिक माहिती घेत पीडित मुलाच्या वडिलांनी सोमवारी सांगलीत येऊन संजयनगर पोलिसांत या महिलेविरोधात लैंगिक शोेषणाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.