टीबी सर्वेक्षण करणा-या आरोग्य सेविकेला संमोहीत करून अंगावरील दागिने लूटले.

76

टीबी सर्वेक्षण करणा-या आरोग्य सेविकेला संमोहीत करून अंगावरील दागिने लूटले.


मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- महाराष्ट्र शासना तर्फे क्षयरोग टीबी रोगाचे सर्वेक्षण संपुर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. प्रत्येक घरी जाऊन आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका आणी आरोग्य सेवक हे सर्वेक्षण करित आहे. मात्र दोन आरोग्य सेविकांना संमोहीत करुन त्याच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने लूट केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

1 डिसेंबर ला दुपारी 12.00 ते 12.30 दरम्यान मुंबईतील विक्रोळी पार्क साईट आरोग्य केंद्र येथील वैशाली कुलवडे पर्यवेक्षक ANM ह्यांच्या विभागात आरोग्य सेविका श्रीमती भारती निकम आणी वनिता गोवेकर ह्या आरोग्य सेविका या विभागात टीबी सर्वेक्षण काम करत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तींनी संमोहीत (Hypnotize) करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. आणी जेव्हा या आरोग्य सेविका शुद्धीवर आल्या त्यावेळे ही खळबळजनक घटना समोर आली. आरोग्य सेविकाची संमोहीत करुन लूट केल्याची रीतसर तक्रार ही सुर्यनागर पोलीस स्टेशनला तक्रार क्रमांक 0046052 ह्या अनुसार पर्यवेक्षक श्रीमती वैशाली कुलवडे व आरोग्य सेविका व समनवयक श्री मनोज शेंडे ह्यानी कोव्हिडं डॉक्टर रिद्धी पटेल विक्रोळी पार्क साईट आरोग्य केंद्र व MOH डॉक्टर महेंद्र खंडाडे ह्यांच्या मार्गदर्शनाने नोंद केली आहे