‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागरचं निधन !

 मुंबई:- सोमवारी दि 7 डिसेंबर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे. छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी तिचं निधन झालं.

दिव्या भटनागर. कोरोनामुळे अवघ्या 34 व्या वर्षी दिव्याचं निधन झालं आहे. कोरोनाचं निदान झाल्यानंतर तिला गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे तिला न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

समोर आलेल्या माहितीनुसार दिव्याला निमोनिया झाला होता. दिव्याची स्थिती गंभीर होती असंही सांगितलं जात आहे. तिची ऑक्सिजन लेव्हल कमी होती. त्यामुळं तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता तिनं जगाचा निरोप घेतला आहे. दिव्या 34 वर्षांची होती.

दिव्याची फ्रेंड अ‍ॅक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्यनं इंस्टावरून पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तू खूप लवकर गेलीस असं म्हणत तिनं भावना मांडल्या आहेत.

मित्रानं केली वृत्ताची पुष्टी

देवोलिनाच्या पोस्ट व्यतिरीक्त दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीनं अ‍ॅक्ट्रेसच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यानं सांगितलं की, आज पहाटे 3 वाजता दिव्याचं निधन झालं आहे. रात्री 2 वा. अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. तिला 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. यानंतर 3 वा. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिनं गुलाबोची भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here