ध्वजनिधीत सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

54

ध्वजनिधीत सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

ध्वजनिधीत सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अमोल येडगे
ध्वजनिधीत सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

यवतमाळ दि.07:- सीमेवर 24 तास सेवा देणारे सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांचे कुटूंबियांकरिता ध्वजनिधीमधून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सैनिकांप्रति समर्पणाच्या भावनेतून व कृतज्ञता म्हणून सर्व नागरिकांनी सशस्र सेना ध्वजनिधीत सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभरंभ आज बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या कडून निधी संकलीत करून करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्यासाठी प्राणाचे बलीदान देणाऱ्या सैनिकांचे कुटूंब म्हणजे आपले कुटूंब समजून त्यांचे दु:ख व वेदना कमी करण्याचे काम आपल्या हातून घडावे, यासाठी ध्वजनिधीला सर्वतोपरी मदत करावी व सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी जिल्ह्याला मागील वर्षी 50 लाख 58 हजार ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले असता त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याने 127 टक्के उद्दिष्ट गाठून 64 लाख 40 हजार ध्वजनिधी संकलीत केला असल्याचे सांगितले. ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ दरवर्षी 7 डिसेंबरपासून करण्यात येतो, यावर्षी देखील उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलीत करावा यासाठी सर्वांनी ध्वजनिधी संकलनाला सहकार्याने करावे, अशी अपेक्षा वऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील वीरमाता तसेच वीरपत्नी यांना शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यात राधाबाई बोरीकर, अलकनंदा सरोदे, सत्वशिला काळे, मंगला सोनोने, नंदाबाई पुरम, सुनीता विहीरे, स्नेहा कुळमेथे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन व आभार बालाजी शेंडगे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख, माजी सैनिक व त्यांचे कुटूंबिय, एन.सी.सी. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.