प्रमाणीक पणा मुळे नागभीड येथील तलाठ्याचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : – नाग भिड़ येथे सहा महिने पासुन कार्यरत असलेले ग्राम अधिकारी श्री,चेतन,जे,चेन्नूरवार ,शासनाचे नविन नियम, पराक्रम शेतकऱ्यांवर लादले ते,म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः शेतावर जावून मोबाईल वर ई-पिक-लाईन वर आपले पिक पेरा नोंदवावे हे नियम यांचे जि,आर काढून अडाणी शेतकरी पिक पेरा नोंद करित नसल्यामुळे तलाठी चेतन यांनी आपल्या साज्यात सुशिक्षीत बेरोजगार युवकांना ई-पिक-लाईन समजावून शासनानी दिलेले आदेश या सुरक्षित बेरोजगार युवका माफॅत ई-पिक-लाईन शेतकऱ्यांची पूर्ण करुण दिली,आज पिक पेरा नोंद केली म्हणून शेतकरी धान आधारभूत खरेदी केंद्र जावून धान विकत आहे,
तलाठी कार्यालय संपूर्ण कामकाज संगणीकीय झाले असुन 7/12व8अ उतारे काढणे,पिक पेरा लावणे,बोझा बसविणे,बोझा कमी करणे, फेरफार नोंद करणे,व इतर कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा व विद्युत पुरवठा असणे गरजेचे असते, पंरतु इंटरनेट सुविधा मिळत नसल्यामुळे सर्व्हर काम करित नाही, म्हणून अनेक समस्यांना सामोर जावे लागते व या कारणास्तव शेतकरी शासनाच्या विविध योजना व अनुदान मिळण्यासाठी अडचणी निर्माण होवू नये, म्हणून दिवस-राञो कामे करुण शेतकरी वर्गास 7/12व8अ पासुन कधिही वंचित ठेवले नाही,
हेच त्यांचे प्रमाणीक पणा जोपासुन साज्यातील शेतकऱ्यांकडून तलाठी चेतन चेन्नूरवार यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे,