मोदी सरकार हे आंधळ्या, बही-यांचे, विदर्भ द्रोही सरकार. — मधुसूदन हरणे

66

मोदी सरकार हे आंधळ्या, बही-यांचे, विदर्भ द्रोही सरकार. — मधुसूदन हरणे

मोदी सरकार हे आंधळ्या, बही-यांचे, विदर्भ द्रोही सरकार. -- मधुसूदन हरणे
मोदी सरकार हे आंधळ्या, बही-यांचे, विदर्भ द्रोही सरकार. — मधुसूदन हरणे

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

वर्धा : -विदर्भ राज्य आंदोलन समीती चे आवाहना नुसार आज दिनांक 7 डिसेंबर ला शेगांव ( कुंड) ता हिंगणघाट येथे स्वभापचे प्रदेशाध्यक्ष व समीतीचे जिल्हा स/मन्वयक श्री मधुसूदन हरणे यांचे नेतृत्वात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे नसल्याचे जे विधान संसदेत केल, त्या विदर्भ विरोधी ” मोदी सरकार व केंद्रीय राज्यमंत्री श्री नित्यानंद ” यांचा निषेध शेकडो कार्यकर्त्यांनी केला.
या वेळी बोलताना श्री मधुसूदन हरणे यांनी, विदर्भ राज्याची मागणी हि विदर्भातील जनता सातत्याने करीत आहे, यासाठी रेल्वे रोको, रस्ता रोको सारखी मोठी आंदोलने, मोर्चे, मेळावे, प्रतीविधानसभा, या सारखी आंदोलने झाली आणी आजही सुरू आहे. याच भारतीय जनता पक्षाने भुवनेश्वर च्या अधिवेशनात ” स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ठराव मंजूर केला, आजचे विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस आणी श्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात ” खामगाव ते आमगाव ” विदर्भ यात्रा काढली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलने केली, पण सत्ता आल्यानंतर हेच मंडळी विदर्भ द्रोही झाले. केंद्रीय राजमंत्री श्री नित्यानंद यांचे विधान म्हणजे मोदी सरकार हे “आंधळ्या, बही-यांचे ” सरकार झाले आहे, यांना विदर्भातील जनतेची मागणी दिसतही नाही, आणी ऐकू ही येत नाही, तेव्हा विदर्भ प्रेमी जनतेनी यांना धडा शिकवावा व मोठ्या आंदोलनासाठी तयार राहावे, असे आवाहन केले.
मोदी सरकारचा आणी केंद्रीय राज्यमंत्री श्री नित्यानंद यांचा पुतळा जाळण्याचे आंदोलन समीती चे वतीने जाहीर झाल्याने आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे पुतळा दहन करता आले नाही, आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात सरपंच श्री राजू नगराळे, ग्राप सदस्य श्री विजय किलनाके, नितीन भगत, सर्वश्री गोकुल वंजारी, गणेश एकोनकर, कमलाकर बोरकर, कमलाकर मुन, दिलीप किलनाके, रोहीत हरणे, नंदू धोटे, अथर्व भोयर, उत्तमराव ठवरी, निखील किलनाके, रविंद्र भगत, राजू ढोबळे, अजय ब्राम्हणवाडे, दत्तू वंजारी, अशोक धोटे, अक्षय धोटे, साहिल किलनाके, महादेवराव मानकर, रमेशराव मानकर इत्यादी सह असंख्य नागरीक आंदोलनात सहभागी होते.