राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त नियोजन बैठक
बैठकीत महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नवनियुक्त सहसचिव श्री. राजेंद्र मुद्दमवार सर यांचा सत्कार

बैठकीत महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नवनियुक्त सहसचिव श्री. राजेंद्र मुद्दमवार सर यांचा सत्कार
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9923497800
राजुरा सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की
आज दि. ०७-१२-२०२१ रोजी शासकीय विश्रामगृह राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. महमूद भाई मुसा यांच्या अध्यक्षतेखाली १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजुराच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा करून नियोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे नवनियुक्त सहसचिव श्री. राजेंद्र मुद्दमवार सर, शहर अध्यक्ष श्री. रखिब शेख, महिला शहर अध्यक्षा सौ. अर्चना ददगाड, युवक तालुकाध्यक्ष श्री. आसिफ सय्यद, सामाजिक सेल चे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मेश्राम ,युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, शहर कार्याध्यक्ष श्री. संदीप पोगला, उपाध्यक्ष सुजित कावळे, जहिर भाई, गौरव कोडापे, प्रमोद कुमरे, राजू ददगाड पंढरी रासेकर,उपस्थित होते.