राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी डाॕ.पडवेंची नियुक्ती.

देवेंद्र सिरसाट.
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
9822917104
महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकिय अधिकारी ‘गट अ’ संघटना (मॅग्मो) जिल्हा नागपूरची बैठक आरोग्य विभाग जिल्हा प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकिय अधिकारी ‘गट अ’ संघटनेची नवीन कार्यकारीणी पाच माजी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली.यामध्ये नागपूर जिल्हाध्यक्षपदी हिंगणा तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.प्रविण पडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. एस.एल. कुडवे, डॉ. एन. आर. भेंडे, डॉ. अशोक पवार, डॉ. संजय मानेकर व डॉ. विद्यानंद गायकवाड ,
डॉ. हर्षवर्धन मानेकर तत्कालीन सचिव उपस्थित होते.
प्रथमतः वैद्यकिय अधिकारी यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तथा त्यावर संघटकीय माध्ममातून निरसन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डॉ. हर्षवर्धन मानेकर यांचे सुचनान्वये ‘सदर गठन हे निवडणूक न घेता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नागपूर जिल्हाध्यक्षपदी -डॉ. प्रविण डी. पडवे ,सचिव -डॉ. प्रविण उमरगेकर ,कोषाध्यक्ष -डॉ. संदीप धरमठोक,कार्याध्यक्ष -डॉ. पराग नारखेडे ,सहअध्यक्ष -डॉ. राजेश गिलानी,डॉ. सुषमा धुर्वे
डॉ. शशांक व्यवहारे,सहसचिव -डॉ. चेतन नाईकवार,डॉ. सोनाली बाके ,डॉ. रुपेष नारनवरे
संघटक -डॉ. तारिक अंसारी
सहसंघटक -डॉ. श्याम खोब्रागडे
राज्यप्रतिनिधी -डॉ. आसिम ईनामदार,डॉ. सचिन हेमके,
तालुका प्रतिनिधी – डॉ. संजय निकम, डॉ. प्रविण राऊत,
डॉ. दिपा कुलकर्णी, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. विवेक सक्सेना व
उर्वरित कार्यकारी सदस्य नियुक्तीबाबत विशेष बैठकित चर्चा करून सर्व घटक समावेशक कार्यकारिणी पूर्णत्वास आणण्याचे ठरविण्यात आले.
नवीन कार्यकारिणी प्रतिनिधींना पदासीन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्य कार्यकारिणी सरचिटणिस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी फोन द्वारे नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
सभेअंती नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थित मान्यवर व सदस्य वैद्यकिय अधिकारी यांचे आभार मानून सभेची सांगता केली.