उपपोस्टे रेगुंठा पोलिसांचा उपक्रम 120 महिलांना मिळणार ‘उज्ज्वला’चा लाभ

58

उपपोस्टे रेगुंठा पोलिसांचा उपक्रम

120 महिलांना मिळणार ‘उज्ज्वला’चा लाभ

उपपोस्टे रेगुंठा पोलिसांचा उपक्रम 120 महिलांना मिळणार ‘उज्ज्वला’चा लाभ
उपपोस्टे रेगुंठा पोलिसांचा उपक्रम
120 महिलांना मिळणार ‘उज्ज्वला’चा लाभ

✒रवि एस. बारसागाडी़ ✒
9010477883
सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा : उपपोलिस ठाणे रेगुंठाचे पीएसओ विजय सानप यांच्या पुढाकाराने उज्वला गॅस योजनेअंतर्गत 120 महिलांचे कागदपत्र घेऊन रजिस्टर करण्यात आले. येत्या एक महिन्यात लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
लाभार्थ्यांकडून 100 रुपये सरकारी फी घेवून एक गॅस शेगडी, लाइटर, दोन सिलींडर, रेगुलेटर व पाईप वाटप करण्यात येणार आहे. सदर मेळाव्याकरीता उपपोलिस स्टेशन रेगुंठाच्या हद्दीतील ज्या महिलांच्या घरांमध्ये गॅस नाही, अशा सर्व महिला सर्व कागदपत्रे घेऊन पोलिस स्टेशनमध्ये हजर होत्या. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.