पनवेलच्या आदिवासी भागात इंडियन्स सोशल मुव्हमेंट टीमने दिली भेट.

मुंबई महानगर प्रतिनिधी✒
मुंबई:- आज भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे जे वास्तव्य दिसून येत आहे ते एक अधुर सत्य आहे. आजही विकासाच्या मुख्य प्रवाहातून दूर असणारा आदिवासी समाज, प्रचंड दारिद्रय, अंगावर नीट कपडे नाही, घरात खायाला अन्न नाही, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही, घराची अवस्था बिकट, कुडाची घरं, शिक्षण घेणे तर दूरच राहिले, अश्या हलाखीच्या परिस्थितीत जगणे, किती कठीण असतं याच्या विचार करुन काळजाचा ठोका चुकतो.

आज श्रीमंताच्या इंडियात गरीब भारताचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यात पनवेल येथील परिसरातील आदिवासी भागातील लोकांना विकास म्हणजे काय हेच माहित नाही. ह्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आणि मुलभुत गरजा पुरवुन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी तशी पाऊल उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण शासन आणि प्रशासन कमी पडली आहे.

पनवेलच्या आदिवासी भागात इंडियन्स सोशल मुव्हमेंट टीमने दिली भेट.

म्हणूनच इंडियन्स सोशल मुव्हमेंटने आदिवासी समाजाच्या घरकुल संबंधित शासकीय योजना राबविण्यात येतात की नाही, पिण्याच्या पाण्या विषयी असलेल्या समस्या दूर कशा करता येईल आणि तयांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासा बद्दल केलेली चर्चा करण्यात आली.

सरकारने त्यांचा विकास निधी किती मंजूर झाला, किती खर्च झाला, कुठे वापरात आणला, की फक्त विकासाच्या नावाखाली गाजर दाखवले याचा जाब विचारणे गरजेचे आहे. असे विचार यावेळी सविताताई सोनावणे कदम राष्ट्रीय अध्यक्षा इंडियन सोशल मूव्हमेंट संविधान अभ्यासक यांनी व्यक्त केले. यावेळी इंडियन सोशल मूव्हमेंटचे अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here