माणगांव मध्ये पिढीत मुलीवर बलात्कार आरोपी अटक

50

माणगांव मध्ये पिढीत मुलीवर बलात्कार आरोपी अटक

माणगांव मध्ये पिढीत मुलीवर बलात्कार आरोपी अटक

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगांव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून आरोपी संतोष टेंबे यास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजन्याच्या सुमारास निजामपूर रोड येथे सुमारे एक किमी अंतरावर आरोपी संतोष गोविंद टेंबे वय वर्ष ३२ रा. हातकेली ता. माणगांव या इसमाने पीडित मुलगी ही अल्पवयिन असून तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत रिक्षात बसवून भर जगंलात घेऊन गेला व रिक्षा थांबवून पीडित मुलीवर अत्याचार करून त्याबाबत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली त्याच प्रमाणे मी जेव्हा जेव्हा तुला बोलावेन त्या त्या वेळेस येत जा जर का नाही आली तर तुझे फोटो सर्वांना पाठवेन अशी धमकी दिली.

या गुन्ह्यांची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वरील इसम संतोष टेंबे याच्या विरोधात कॉ. गु रजि नं ३५०/२०२२ भा. द. वि. कलम ३७६ (५)जे ३७६ (२) ५०६ बाळाचे लेंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली, म. पो.स. ई. अस्मिता पाटील व पो.हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.या घटने विरुद्धात माणगांव तालुक्यात खलबल उडाली असून नागरिकात संताप व्यक्त होत आहे.