कळमना येथे पशुधन वंध्यत्व निवारण शिबिर आयोजन. पं. स. राजुरा मार्फत पांढरपौनी पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत उपक्रम.

54
कळमना येथे पशुधन वंध्यत्व निवारण शिबिर आयोजन. पं. स. राजुरा मार्फत पांढरपौनी पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत उपक्रम.

कळमना येथे पशुधन वंध्यत्व निवारण शिबिर आयोजन.

पं. स. राजुरा मार्फत पांढरपौनी पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत उपक्रम.

कळमना येथे पशुधन वंध्यत्व निवारण शिबिर आयोजन. पं. स. राजुरा मार्फत पांढरपौनी पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत उपक्रम.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजुरा :– पंचायत समिती राजुरा मार्फत पशु वैद्यकीय विभाग पाढरपौणी अंतर्गत मौजा कळमना येथे पशुधन वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कळमनाचे स्मार्ट उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीत पशुधनाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे या पशुधनाचे संवर्धन संरक्षण करणे काळाची गरज आहे. या शिबिराचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पशुना असलेल्या विविध आजारांचे निदान, तपासणी व उपचार करून घ्यावे.
या प्रसंगी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या धांडे मडम, पशुधन पर्यवेक्षक आर. एन. मेडपपलीवार, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, माजी तमुस अध्यक्ष महादेव ताजणे, शिव मोरे, तिकाचद येडे, दिलीप घ्यार, परिचारिका, सुरेश गौरकार, देवराव ताजणे, मारोती साळवे, अनिल बोढाले, समाधान दिवसे, शंकर फिसके, संभाजी साळवे, अरुण आसवले, गणपती वाढई, मारोती विददे, मंगेश ताजणे, राहुल साळवे, विठ्ठल बल्की, नवनाथ ताजणे, लटारी बल्की यासह समस्त गावकरी उपस्थित होते.