पालकांनो वेळीच सावध व्हा ! खाजगी स्कूल बसेसची असुरक्षित वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतेय धोकादायक • क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची होतेय वाहतूक

49
पालकांनो वेळीच सावध व्हा ! खाजगी स्कूल बसेसची असुरक्षित वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतेय धोकादायक • क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची होतेय वाहतूक

पालकांनो वेळीच सावध व्हा !
खाजगी स्कूल बसेसची असुरक्षित वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतेय धोकादायक

• क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची होतेय वाहतूक

पालकांनो वेळीच सावध व्हा ! खाजगी स्कूल बसेसची असुरक्षित वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतेय धोकादायक • क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची होतेय वाहतूक

🖋️ साहिल सैय्यद

घुग्घूस : शहरातील अनेक शाळांत विद्यार्थ्यांना शाळेत ने -आन करण्यासाठी त्यांना घरी पोहचविण्यासाठी शाळेतर्फे बसेसची व्यवस्था केली असते. या स्कुल बस चालकांनी जास्त नफा कमविण्याच्या नादात स्कूल बसेस मधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवून अवैधरीत्या धोकादायक वाहतूक सुरू केली आहे.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत व परतिच्या प्रवासात घरापर्यंत उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. शहराच्या रस्त्यांची बिकट अवस्था पाहता या प्रकारे होत असलेली अवैध वाहतूक विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते तसेच भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.
राजीव रतन चौकातील उड्डाणपूलाचे कार्य गेल्या दोन वर्षांपासून कासवगतीने सुरु असून याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या बसेस मधील शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक ठरू पाहणाऱ्या या खाजगी स्कुल बसेसची तातडीने फिटनेस तपासणी करून असुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कुल बसेसवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत योग्य कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.