थंडी गायब…आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत खोडा
फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: फेंगल वादळामुळे अचानक थंडी गायब झाली. तपमानात वाढ झाली. ढगाळ वतावरणामुळे आद्रतेच प्रमाण वाढले. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे.
फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडला. थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत.आधी हवामानातील बदलांमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया यावर्षी उशिरा सुरू झाली होती. लांबलेला पाऊस हे मागचे प्रमुख कारण होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र फेंगल वादळामुळे अचानक थंडी गायब झाली. तपमानात वाढ झाली. ढगाळ वतावरणामुळे आद्रतेच प्रमाण वाढले. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे.
कोकणात ऑक्टोबर महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्याची प्रक्रीया सरू होते. ही प्रक्रीया तीन टप्प्यात साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पहिल्या टप्प्यातील आंबा हा जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होण्यास सुरूवात होतो. या आंब्याची अतिशय चढ्या दराने विक्री होते. दुसऱ्य़ा टप्प्यातील आंबा साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात दाखल होतो. आंब्याची आवक वाढल्याने दर कमी होण्यास सुरूवात होते. तिसऱ्या टप्प्यातील आंबा हा एप्रिल महिन्यात दाखल होतो. सर्व सामान्याच्या आवाक्यात असल्याने हा आंबा महत्वाचा असतो.मात्र यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. कारण आंब्याला मोहर येण्याची प्रक्रीया लांबली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. कोकणात यंदा २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे जमिनीत अद्याप ओलावा टिकून आहे. ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यात थंडी गायब झाल्याने अधिकच भर पडली आहे.
रायगड जिल्ह्यात आंब्याची ४५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. ज्यातील १६ हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. दरवर्षी यातून २१ हजार मेट्रिक टन उत्पादन मिळते तर रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर वर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून सुमारे ८० हजार मेट्रीक टन उत्पादन होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याला पावसाचा तडाखा.शुक्रवार आणि शनिवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे बागायदार धास्तावले आहेत. पावासामुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा ३२ हजार ४५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्र उत्पादन देणारे आहे. जवळपास सुमारे ७८ हजार टन आंबा उत्पादन मिळते. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थांबला नाही त्यामुळे तो बारमाही कोसळण्याची भिती बागायतदारांना वाटते. समुद्रात वारंवार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की समुद्र किनारी भागात हवामानाचा फटका बसतोय. फळझाडांवरील मोहर टिकविण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागते. त्यामुळे आर्थिक बजेट वाढते, तरीही निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मार्ग निघाला पाहिजे.
बाळासाहेब परुळेकर आंबा बागायतदार सिंधुदुर्ग
हवामानातील बदलांमुळे पाऊस कोसळत असल्याने फळबागांतील मोहोराचे संरक्षण करणाऱ्या बागायतदारांचे आर्थिक दृष्ट्या बजेट वाढते. गुलाबी थंडी टिकली नाही तर एका महिन्याने पीक लांबेल. पावसामुळे फळझाडांवरील मोहर गळून पडन्याची शक्यता आहे. तसेच नवी पालवी फुटेल. मोहर न येता पालवी कडक होन्याची शक्यता आहे. मोहर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान होणार नाही. पण मोहर टिकविण्यासाठी औषधे व किटकनाशके फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल. मात्र हे क्षेत्र किरकोळ प्रमाणात आहे. अरुण नातू कोरडवाहू विकास यंत्रणा जिल्हा सल्लागार सिंधुदुर्ग