पॉर्न क्लिप पाहून शारीरिक संबंध करणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू.

नागपूर:- मध्ये पॉर्न क्लिप पाहून शारीरिक संबंध करणे एका प्रेमीयुगलासाठी जीवघेणे ठरले आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा गळफास लागून लागून मृत्यू झाला आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक लॉजच्या रुमवर प्रेमीयुगल पॉर्न क्लिप बघून वेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना ही घटना घडली. मयत तरुण विवाहित असून त्याला लहान मुलगा आहे. तरही तो 20 वर्षीय तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा इंजिनीअर असून त्याचे लग्न झाले आहे. मात्र, त्याचे गेल्या काही दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे कळत आहे. दरम्यान, दोघांनीही गुरुवारी बाहेर फिरायला जाण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर पॉर्न फिल्म पाहून तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक सबंध प्रस्थापित करण्यासाठी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याने हात आणि पाय दोरीने बांधून घेतले आणि दोघांनी शाररिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरूणी बाथरूम मध्ये गेली असताना तरूण खुर्चीसह खाली कोळसला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेली दोरी आवळली गेली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेत प्रेमीयुगलाने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉज वरील खोलीत गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी तरुणाच्या गळ्याच्या भवती सुद्धा अवळली गेली. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर ती तरुणी बाथरूम मध्ये गेली असता. तो तरुण खुर्ची सहखाली कोसळला, ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता, ज्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here