वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे 150 फूट दरीत कोसळला, 2 ठार, 61 जखमी

57

वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे 150 फूट दरीत कोसळला, 2 ठार, 61 जखमी

शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास कुडपण गावात लग्न कार्यासाठी आलेल्या वऱ्हाड मंडळींच्या गाडीला लग्नकार्य आटोपून खेड खवटी धनगरवाडीकडे परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली, या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेड, महाबळेश्वर टेकर्स, पोलादपूरसह महाड येथील टीम घटनास्थळी दाखल झाल्यात.

रायगड:- पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे 150 फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर 61 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला.

अपघातातील जखमींना महाड, पाेलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. सातारा जिल्ह्यातील कुमटे-काेंडाेशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत हाेते. पात्री खिंडीतून परतत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता आहे. विठ्ठल बक्कु झोरे 65, रा. खवटी ता. खेड, तुकाराम दत्तू झोरे 40,रा. कावले, कुंभारडे ता. महाड, भावेश हरिश्चंद्र होगाडे 23, रा. तुळशी धनगर वाडी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक माहिती

या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय. यापैकी अनेक जण जखमी झाले आहेत, तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वऱ्हाडाने संपूर्ण ट्रक भरलेला होता. घटनास्थळी पोलीस, ट्रेकर्स रवाना झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलेय.