एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला ओडिशाला नेऊ पाहणारी महिला अटक.

अशोक शाही प्रतिनिधी

मालाड:- एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला ओडिशाला नेऊ पाहणाऱया महिलेला मालवणी पोलिसांनी अटक केली. सफाला नायक असे तिचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून अपहरण झालेल्या बालिकेची सुटका केली. लहान मुलाची आवड असल्याने सफालाने हे पृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

सफाला ही मूळची ओडिशाची रहिवासी असून ती मालाड परिसरात घरकाम करून राहते. दोन दिवसांपूर्वी सफालाची नोकरी सुटल्याने ती मुलीच्या घरी गेली. एक दिवस राहायला द्यावे अशी तिने विनंती केली असता मुलीच्या वडिलांनी त्याला नकार दिला.

अखेर मुलीच्या आईने सफालाला घरी राहण्यास दिले. दुसऱया दिवशी सकाळी सफालाने घरी नाश्ता केला. घराबाहेर खेळत असणाऱया मुलीचे सफालाने अपहरण केले. मुलगी घराबाहेर नसल्याने तिचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने तिच्या पुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या.

वरिष्ठ निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने, महिला उप निरीक्षक उषा खोसे आदी अधिकाऱयांनी तपास सुरू केला. तपासासाठी तीन पथके तयार केली. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून सफालाला ठाण्याच्या हिरानंदानी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. तिच्याकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. शनिवारी सफालाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here