जिल्ह्यात 66 कोरोना पॉझिटिव्ह तर 03 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात 66 कोरोना पॉझिटिव्ह तर 03 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात 66 कोरोना पॉझिटिव्ह तर 03 रुग्णांना डिस्चार्ज

एकूण डिस्चार्ज 58980                                              • एकूण पॉझिटिव्ह 60301

• क्रियाशील रुग्ण 187                                                 • आज मृत्यू शून्य

• एकूण मृत्यू 1134                                                      • रिकव्हरी रेट 98.00 टक्के

• मृत्यू दर 01.88                                                          • आजच्या टेस्ट 1174                     

. एकूण टेस्ट 491587

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा, दि. 9 : भंडारा जिल्ह्यात रविवारी 66 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.9) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 03 आहे. रविवारी 1174 व्यक्तींची चाचणी केली असता 66 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 187 सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58980 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60301 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 91 हजार 587 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60301 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 38, मोहाडी 01, तुमसर 12, पवनी 03, लाखनी 05, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 04 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1134 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

· कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.

· जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.

· कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here