नागभीड तालुक्यात विविध विकास कामांच्या बांधकामांना सुरुवात
जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांचा पुढाकार
राजेश बारसागडे
तळोधी (बा.) तालुका प्रतिनिधी
8830961332
तळोधी (बा.):- जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे यांच्या प्रयत्नातुन जिल्हा निधी मधून पंचायत समिती नागभीड अंतर्गत
तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांना निधी प्राप्त झाला असून नव्या वर्षात बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे.
कुठलाही भेद न करता त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांचा विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचा जि. प. सदस्य खोजराम मरसकोल्हे यांचा मानस राहिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मांगरुड येथील नवीन इमारती करिता 20 लक्ष रुपये,जुन्या इमारतीचे नूतनिकरनाकरीता 9 लक्ष 97 हजार रुपये, किचन शेड करीता 6 लक्ष 30 हजार रुपयांच्या बांधकामांना गुरुवारी सुरुवात करण्यात आली असून सदर कामांचे भूमीपूजन जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच यशवंत मेश्राम,उपसरपंच वैभव निकुरे, मुख्याध्यापक श्री बावनकर,सहायक शिक्षक पांडव गायकवाड,वानखेडे,बुधाकर गुरनुले,माजी सरपंच नानू गेडाम,हिवराज सेलवटकर व गावकऱ्यांची उपस्थिती होती.