पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा महानगर भाजपाची मागणी, राष्ट्रपतींना दिले निवेदन

पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा
महानगर भाजपाची मागणी : राष्ट्रपतींना निवेदन

पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा महानगर भजपाची मागणी : राष्ट्रपतींना निवेदन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

चंद्रपूर : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्राणघातक हल्ला हा काँग्रेसचा कट आहे. सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली नाही तर ती केली गेली.असा स्पष्ट आरोप करीत शुक्रवार(7 जानेवारीला भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने राष्ट्रपतीला जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर केले.पंजाब सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने निवेदन दिले.यावेळी महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,मंडळ प्रमुख रवी लोणकर,रितेश वर्मा व रामकुमार अकापेलीवार यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,पंजाब मध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी सुरक्षाकवच भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता रोकला.आंदोलक शेतकऱ्यांनीं विरोधाची भूमिका घेतल्याने मोदींना फिरोजपुर येथील रॅली रद्द करावी लागली.सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही.या प्रकारास पंजाब सरकार दोषी आहे.पंतप्रधान मोदींवर हा एक प्रकारे हल्लाच होता,असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर भाजपाच्या प्रत्येक रॅलीला विरोध करणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला होता.पंतप्रधान मोदींच्या रॅलीला शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका स्वीकारताच मंगळवारी रात्री शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यात बैठक झाली. त्यात 15 मार्च रोजी पंतप्रधान मोदी सोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तरीही शेतकऱ्यांनी बुधवारी पंतप्रधानांचा ताफा रोखलाच.या कडे डॉ गुलवाडे यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान रस्ते मार्गे जाणार हे निश्चित झाल्यावर या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आवश्यकता होती मात्र तशी व्यवस्था दिसून आली नाही.त्यामुळेच याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागविण्यात आला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कुचराई करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. पंजाब येथे घडलेला प्रकार तेथील सुरक्षा व्यवस्था ढेपाळलेली असल्याचे प्रमाण आहे. यासाठी संपूर्णपणे पंजाब सरकार जबाबदार आहे. काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा आम्ही निषेध करतो. पंजाब सरकार पंतप्रधानांची सुरक्षा करू शकत नसेल तर सामान्य जनतेची पण करू शकत नाही.म्हणुन पंजाब सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.अशी मागणी डॉ गुलवाडे यांनी केली. भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल,असा इशारा त्यांनी दिला.