नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या 8 जणांविरूद्ध कारवाई

नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या 8 जणांविरूद्ध कारवाई

नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या 8 जणांविरूद्ध कारवाई

नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या 8 जणांविरूद्ध कारवाई

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर, 9 जानेवारी
प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणार्‍यांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. भद्रावती, दुर्गापूर, राजुरा, राजुरा, चंद्रपूर शहर, ब्रम्हपुुरी, रामनगर, घग्घुस, बल्लारपूर आदी पोलिस ठाणे हद्दीत नायलॉन मांजा विकणार्‍या 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर 74 हजार 370 रूपयाचा दंड  ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रतिबंधीत मांजाही जप्त करण्यात आला.
मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे हा मांजा वापरणाविरूद्ध कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील भद्रावती, दुगार्र्पूर, राजुरा, राजुरा, चंद्रपूर शहर, ब्रम्हपुुरी, रामनगर, घग्घुस, बल्लारपूर आदी ठिकाणी या मांजाची विक्री करणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवीेंद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.