श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन
अलिबाग (प्रतिनिधी)
श्री समर्थ विचार फाउंडेशन’-रायगड तर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय सुशिला सखाराम पाटील यांच्या पुण्यतिथी चे औचित्त्त साधून ‘श्री समर्थ विचार फाउंडेशन’ च्या वतीने राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा (खुला गट) आयोजित केली आहे. राज्यातील सर्व साहित्यकांसाठी सुवर्ण संधी आहे. सर्व साहित्यिकांनी या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजका तर्फे आव्हान करण्यात आले आहे.
काव्य लेखन स्पर्धेचे विषयः१) माझी आई२) ‘आई’ माझे दैवत.३) आईविना घर खाली.असे असून स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. १)सुरुवातीस
‘स्पर्धेसाठी…’ असा उल्लेख करावा.तसेच
‘आई’ च्या पुण्यस्मरणानिमित्त काव्यात्मक आदरांजली.
शीर्षकः——असे लिहावे.२) कोणत्याही एका विषयावर कविता लिहिणे.३) कविता वेळेतच पाठवावी. वेळेनंतर आलेली कविता संकलनात घेतली जाणार नाही.४) दिलेल्या विषयानुसार रचना येणे बंधनकारक आहे. योग्य शीर्षक द्यावे.५) ‘आई’ हा शब्द कवितेत असणे अनिवार्य आहे. ६) रचना स्वलिखित व अर्थपूर्ण असावी. लयबद्ध, विरामचिन्हे आणि व्याकरण नियमांनुसार लिहिण्याचा प्रयत्न करावा.७) प्रत्येकाने एकच रचना पोस्ट करावी.८) रचनेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक मराठीत टाईप करावे.९) १६ ते २० ओळींची काव्यरचना असावी.१०) विषयाला धरून व व्याकरण अचूक असणारी रचना असावी११) पी.डी.एफ. स्वरूपात कविता पाठवू नये.१२) कविता ही मराठी भाषेत देवनागरी लिपीत टाईप करून दिलेली Link open करून Joint होऊन तेथे पाठवावी.
१३) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहिल.१४) कविता पाठवण्याचा काळावधीः शुक्रवार दि.१० जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत.
१५) स्पर्धेचा निकाल २३ मार्च २०२५ रोजी गृपवरच जाहिर करण्यात येईल.१६) पारितोषिकाचे स्वरूप – रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे..
(रोख रक्कम विजेत्यांना G-pay केली जाईल व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र घरपोच पाठविले जाईल.)१) प्रथम क्रमांक-३३३३ रुपये२) द्वितीय क्रमांक-२२२२ रुपये३) तृतीय क्रमांक-११११ रुपये४) चतुर्थ क्रमांक-७७७ रुपये५) पाचवा क्रमांक-७७७ रुपये
तसेच पाच क्रमांक उत्तेजनार्थ काढले जातील.उत्तेजनार्थ प्रत्येकी-५५५ रुपये.
१७) सहभागींनाही डिझीटल सहभाग सन्मानपत्र देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.स्पर्धेची संकल्पनाः ॲड. रत्नाकर पाटील-(अलिबाग-रायगड)9420325993
स्पर्धेचे आयोजकः.नवनाथ ठाकुर-(ठाणे)9833584052