वर्धा जिल्हात बरबडी जवळ अपघात, कार ट्रकमध्ये घुसली.
आशीष अंबादे प्रतीनिधी
वर्धा:- जिल्हातील बरबडी परीसरात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागून येत असलेली कार ट्रकमध्ये घुसल्याने झालेल्या या अपघात कार मधील चालक सह प्रवाशी जखमी झाले आहे. मात्र सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील बरबडी शिवारात ट्रक क्रमांक ए.पि.16 टि.पि.2149 चा चालक मत्ते संधीधार इब्राहिम हा भरधाव वेगाने नागपूर कडुन जामकडे जात होता. याच दरम्यान कामठी येथिल कार चालक मालक जाहिद अली मोहम्मद हा कार क्रमांक. एम.ए.47 के.5414 ने चंद्रपूरला नातेवाईकांच्या भेटीसाठी जात होता मात्र समोर चालणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येण्यारी कार ट्रक मध्ये घुसल्याने या झालेल्या अपघातात कार मधील व्यक्तीच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सुदैवाने या अपघात कार मधील व्यक्ती थोडक्यात बचावले. या अपघाताची नोंद सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहे.