हिंगणघाट मध्ये पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला.
प्रशांत जगताप प्रतिनिधी
हिंगणघाट:- शहरातील भीमनगर वार्डात एका महीलेवर स्वताःच्या पतीने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घळली आहे. या चाकू हल्ल्यात महीला गंभीररित्या जखमी झाली आहे. महिला दळन आणायला गेली होती. ती परत आली तर काही करण नसतांना तिच्या बरोबर नव-याने वाद सुरु केला. तीला मारहाण सुरु केली. नंतर भाजी कपायचा चाकूने पत्नीवर वार केला त्यामूळे ती जखमी झाली. ही घटना हिंगणघाट येथील भिमनगर वार्डा मध्ये घडली. याबाबत पत्नी रेश्मा संदीप कांबळे हिने आपल्या पती विरुद्ध हिंगणघाट पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पती संदीप कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसा कडुन प्राप्त माहिती नुसार रेश्मा संदीप कांबळे ही विवाहित महिला दळन आणायला गेली होती. ती परत आली तर तु कुठे गेली होती, असे विचारत शिवीगाळ करणे सुरु केले. काही करण नसतांना रेश्मा कांबळे ला संदीप मारहाण सुरु केली. आणी घरातील भाजी कापण्या करीता वापरण्यात येणारा चाकू आणुन संदीपने रेश्मा वर वार केला. त्यामुळे रेश्माच्या हातावर आणी बोटावर जखमा झाल्या. शेजा-यांच्या मदतीने तीने पोलिस स्टेशन गाठले आणी आपल्या पती विरुद्ध तक्रार दाखल केली. रेश्मा कांबळेची वैधकीय तपासणीच्या अहवाला नंतर संदीप कांबळे विरुद्ध विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस करत आहे.