नात्यात गोडवा वाढवण्यासाठी, चॉकलेट डे निमित्त शेअर चॉकलेट, आणा नात्यात गोडवा!
फेब्रुवारी महिन्यात मित्रांसोबत आनंदाच्या प्रेमाच्या हंगामाला सुरुवात होते नात्यात गोडवा वाढवण्यासाठी 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वत्र प्रेमाला बहर आलेला पाहायला मिळतो. व्हॅलेटाईन वीक च्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात. युवा, युगल आणि मित्र या डे चा आनंद घेताना दिसतात.
प्रशांत जगताप
फेब्रुवारी महिन्यात मित्रांसोबत आनंदाच्या प्रेमाच्या हंगामाला सुरुवात होते. नात्यात गोडवा वाढवण्यासाठी 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वत्र प्रेमाला बहर आलेला पाहायला मिळतो. व्हॅलेटाईन वीकच्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात. कपल्स या डे चा आनंद घेताना दिसतात. तरुणाईमध्ये तर डेज चे विशेष आकर्षण असते. व्हॅलेटाईन वीकमधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील यंदाचा चॉकलेट खास करण्यासाठी ही मराठी शुभेच्छा संदेश, आणि शुभेच्छापत्रं सोशल मीडिया माध्यमातून शेअर करुन शकता. व्हॅलेटाईन वीकमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक दिवशी छानसे गिफ्ट देऊन पार्टनरला खुश केले जाते. परंतु, केवळ शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीचा दिवस आनंदी करु शकता.