शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका, दिवंगत लता मंगेशकरांच्या स्मारकाचा वाद

शिवाजी पार्कवर आजवर शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकरांचा अंत्यविधी

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका, दिवंगत लता मंगेशकरांच्या स्मारकाचा वाद

सिद्धांत
९ फेब्रुवारी, मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दादरमधील शिवाजी पार्कवर करण्यात आले. त्यानतंर काही लोकांनी शिवाजी पार्कवरच लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली. भाजपचे राम कदम यांनी या आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले. यानंतर या विषयावरील दुसरी बाजू राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी मांडली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी मांडले आपले मत
प्रकाश आंबेडकरांनी याबाबत आपले मत मांडताना म्हणाले कि, शिवाजी पार्क हे एक खेळाचे मैदानच राहिले पाहिजे. त्याला स्मशानभूमी बनवली जाऊ नये असे मला वाटते. स्मारक बनविण्यासाठी मुंबईत अनेक जागा मिळतील. पण त्यासाठी मुलांच्या खेळाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये.

मनसेचे प्रवक्ते राहुल देशपांडे यांनीही या बाबीला दुजोरा देत म्हटले कि, शिवाजी पार्क हे खेळाचे मैदानाला अनेक वेळा नागरिकांनी लढा देऊन अतिक्रमणापासून वाचवलं आहे. कृपया राजकारणामध्ये ह्या मैदानाचा बळी देऊ नका.

हे आपण वाचलंत का ?

शिवाजी पार्कवर आजवर शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि अलीकडे लता मंगेशकरांचा अंत्यविधी करण्यात आला होता. यापूर्वी १९८६ मध्ये अभिनेत्री स्मिता पाटील आणि २०१९ मध्ये क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, परंतु त्यांचा अंत्यसंस्कार शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत करण्यात आला होता.

संजय राऊत काय म्हणाले?
लता मंगेशकर या एका महान आत्मा होत्या. महाराष्ट्राशी त्यांचं दृढ नातं होत, या देशात त्यांनी जन्म घेतला हे आपलं भाग्यच आहे. त्यांचं स्मारक बनविण्याचे कार्यामध्ये देशाला लक्ष घालावा लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी स्मारकाची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे मत व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here