Happy Chocolate Day: ‘चॉकलेट डे’ आपल्या जिवलगा बरोबर कुछ मीठा हो जाये!
✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक ✒
📱7385445348
चॉकलेट डे:- प्रेमीयुगला साठी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा खुप स्पेशल असते. कारण या आठवडा व्हॅलेंटाईन सप्ताहा म्हणून जगभरात उत्साहात साजरा करण्याची परंपरा आज प्रत्येकात दिसून येत असते. प्रेमी प्रेमीका तर या व्हॅलेंटाईन डे विकची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि असे क्षण नेहमी जीवनात येत रहो अशी आशा व्यक्त करत असतात. !
प्रेमीयुगलाचा स्पेशल व्हॅलेंटाईन वीकला 7 फेब्रुवारी पासून तरुणाच्या नव उत्साहाला सुरुवात झाली आहे. आज “चॉकलेट डे” या दिवशी लोक आपल्या स्पेशल व्यक्ती, मैत्रिण, जोडीदार यांना ‘चॉकलेट’ देऊन आयुष्य चॉकलेट सारख मधुर, चवदार, रसदार व्हाव अशी भावना असते. प्रेमळ जीवनात मधुरता भरण्यासाठी हे क्षण जिवनभर असेच रहावे म्हणून आपल्या जोडीदाराला ‘चॉकलेट’ भरवून आपल्या मनातील भावना व्यक्त करा.
आपल्या आयुष्यात आपण व आपला जोडीदार, मित्र, मैत्रिण प्रेमिका, प्रेमी हे नहमी खुश असावे अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. त्यात चॉकलेट हे सर्वाना आवडणारे असते. चॉकलेट सारखा गोडवा पण जीवनात यावा अस प्रत्येकाला वाटते.
व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी आपल्या परीने नात्यात गोडवा निर्माण करावा लागतो, आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘सुमधूर बोली’, ‘समजदारी’ आणि ‘दुखात साथ’. या तीन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाही. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवुन आपल्या मनातील भावना प्रकट करु शकता.
चॉकलेट हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ चांगली राहते. चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन आणि कॅफिन असते, जे मन ताजेतवाने करतात आणि मेंदूतील एंडोर्फिनचा स्राव वाढवतात, ज्यामुळे आनंदाची भावना येते. चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो.
चॉकलेट आवडत नाही अशा व्यक्ती जरा कमीच असतील कोणत्या ना कोणत्या प्रकारातील चॉकलेट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काहींसाठी छोट्या मोठ्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी चॉकलेट मदत करते. काहीजण रूसवे-फुगवे दूर करण्यासाठी चॉकलेटची मदत घेतात अनेकांसाठी आनंद, सेलिब्रेशनचा सोबती हा चॉकलेट असतो. मग तुम्ही देखील व्हॅलेंटाईन वीक मधील आजचा हा चॉकलेट डे कसा आणि कोणत्या चॉकलेट सोबत साजरा करताय ते आमच्या सोबतही शेअर करा आणि या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.