माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त “लोकसत्ताक स्टडी सेंटरचे” भांडुप येथे उद्धाटन सोहळा संपन्न
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई : – लोकशाहीच्या चार स्तंभावरती संविधानिक मूल्यांनी प्रेरित झालेले सर्वसाधारण स्तरातील युवक – युवती, विद्यार्थी – विद्यार्थीनी पोहोचावेत या सामाजिक जाणिवेच्या उद्देशाने आपण लोकसत्ताक स्टडी सेंटर विविध विभागात आपल्या सर्वांच्या सहयोग व सहकार्याने ऊभारीत आहोत. ३ जानेवारी २०२० रोजी सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी पहिले लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन येथे सूरू झाले. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकसत्ताक संघटना , लोक हितकारिणी संस्था (रजि) आणि सम्यक संबोधी बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी, दुसऱ्या स्टडी सेंटरचे उद्धाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
स्टडी सेंटरचे उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे मा.अर्जुन डांगळे सर (जेष्ठ साहित्यीक) यांच्या हस्ते उद्घाटन लोकसत्ताक स्टडी सेंटर भांडूप येथे करण्यात आले. तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्पुटर लॅब, छत्रपती शाहू महाराज हेल्प डेस्क , महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले प्रशिक्षण वर्ग , फातिमा शेख महिला सक्षमीकरण आणि मार्गदर्शन केंद्र , सम्राट अशोक व्याख्यान माला, प्रबोधनकार ठाकरे वृत्त पत्र वाचनालय आदी कक्ष यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले .
सदर महत्वपूर्ण प्रसंगी मान्यवर मा.डॉ. रेवत कानिंदे ( वैद्यकीय अधिकारी सर जे.जे.हॉस्पिटल ) ,मा.प्रा विजय मोहिते सर (प्राध्यापक सिद्धार्थ महाविद्यालय) मा.मधुसूदन गायकवाड(कार्यक्रमाचे अध्यक्ष), मा.अमोलकुमार बोधिराज (अध्यक्ष- भारतीय लोकसत्ताक संघटना ) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानांच्या प्रास्ताविकेचे वाचन करून मा. वैशाली मोहिते-कदम मॅडम यांनीं केली. तसेच संघटनेचे ध्येय उद्दिष्टे व स्टडी सेंटर मधील उपक्रमाविषयी माहिती मा.मनिष जाधव यांनी मार्गदर्शन केले. मा.दिलीप सावंत (शिवसेना शाखा प्रमुख) यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे अभिनंदन केले , त्यानंतर मा.डॉ. रेवत कानिंदे सर यांनी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या, वैद्यकीय योजनांची माहिती दिली तसेच वैद्यकीय माहितीसाठी आम्ही सर्व तत्पर आहोत असे आश्वासन दिले. मा.अर्जुन डांगळे सर (जेष्ठ साहित्यीक) यांनी सर्वांचे अभिनंदन केले तरुणांना तयार केले पाहिजे, आता चळवळीची अस्त्रे बदलली आहेत त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले. मा.अमोलकुमार बोधिराज सर (अध्यक्ष – भारतीय लोकसत्ताक संघटना) यांनी संघटनेची भूमिका मांडली, चळवळीतील ज्येष्ठ यांचे मार्गदर्शान आणि तरुणांची शक्ती यांनी नक्कीच योग्यदिशेने काम होऊ शकते असे संबोधिले, त्या नंतर मा.प्रा विजय मोहिते सर (सिद्धार्थ महाविद्यालय) यांनी भारतीय लोकसत्ताक संघटना आणि लोकसत्ताक स्टडी सेंटर यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या, गेली १० वर्षे संघटना सातत्यपूर्णपणे कार्य करीत आहे या बाबत अभिनंदन व्यक्त केले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई साठी जे पत्र लिहिले होते त्याचा पुन्हा उजाळा करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा मधुसूदन गायकवाड सर यांनी अध्यक्षीय भाषण केल त्यांनी आपले स्टडी सेन्टर चे काम असेच चांगले चालत राहो आम्ही तुमच्या सोबत आहोत असे बोलून सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास #MRS_INDIA_PRIDE_OF_NATION 2021 मा. स्नेहल ठमके, गाईका मा.रसिका बोरकर, यांची विशेष उपस्थिती होती त्यांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ऍड हर्षु साळवे सर ,सरवदे गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ते रुपेश पुरळकर, ,चंद्रमणी दांडगे सर उपस्थित होते, अश्या पद्धतीने कार्यक्रम मोठया उत्साहात पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन मा.सुप्रिया मोहिते-जाधव मॅडम यांनी केले. मा.विशाल गायकवाड सर (कोषाध्यक्ष भारतीय लोकसत्ताक संघटना) यांनी सर्व पाहुण्यांचे, सर्व ज्येष्ठांचे, तसेच सम्यक संबोधी फाऊंडेशन, पंचशील मिञ मंडळ, यांचे सर्व पदाद्धिकारी, भारतीय लोकसत्ताक संघटना यांचे सर्व सदस्य, कार्यक्रमास उपस्थित सर्व सामाजिक जाणिवेचे व्यक्तिमत्त्व व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, त्या सर्वांचे संघटनेरच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सहभागी असलेले कार्यकर्ते- वैभव मोहिते,रामचंद्र जाधव,दिलीप सोनावणे,निखिल सुर्वे,सनी कांबळे, मंगेश खरात, अजय तायडे,पिलाजी कांबळे,किशोर येडे,कमलेश मोहिते,योगेश कांबळे, अभिषेक कासे,नितीन सातपुते, आंनद नवतुरे,श्रेयस जाधव,मिलिंद मोहिते,संदीप आग्रे, मयुरेश जंगम,अरुण खरात,विनोद जेटीदार,आकाश लिहिणार,ऍड रुपाली खळे,सुषमा,सावंत,अश्विनी पवडमन ,रोहित कांबळे,अतुल म्हस्के पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक,बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.