कर्मचाऱ्यांअभावी खातेदारांची गैरसोय बँक ऑफ इंडिया तुमसर…

52

कर्मचाऱ्यांअभावी खातेदारांची गैरसोय

बँक ऑफ इंडिया तुमसर…

कर्मचाऱ्यांअभावी खातेदारांची गैरसोय बँक ऑफ इंडिया तुमसर...

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /तुमसर : शहरातील बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. तुमसर येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखांतर्गत सत्तर हजारावर खातेदार आहेत. तसेच हजारोवर खातेदारांना सेवेसाठी फक्त तीन कर्मचारी, पाच अधिकारी आणि दोन लिपिक देण्यात आले असून येथे लिपिकांची गरज असल्याची माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीचंद खरोले यांनी दिली आहे. शेकडो खातेदार दैनिक कामासाठी येतात. पण त्यांना वेळेवर व्यवहार करता येत नसल्याकारणाने ग्राहकांत बँकेविरुद्ध -रोष दिसून येत आहे. याठिकाणी बचत खाते, ठेवीदार, खाते उघडण्यासंबंधी, शिष्यवृत्ती, रोहयोचे मजूर, निराधार लाभार्थी, कर्ज आदी कार्यासाठी शेकडो खातेदार दररोज येतात. त्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. त्यामुळे रोख व्यवहारात ग्राहकांची गैरसोय होत असल्याची ओरड आहे. कर्मचाऱ्यांची गरज असून सक्षम रोखपाल, लिपिक आदींची नियुक्ती करण्यात यावी आणि खातेदारांच्या जमा रोखचे दोन काउंटर, पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या बँकेत पेन्शनधारक, अपंग, विधवा महिला, वृद्ध पुरुष-महिला विविध शासनाच्या योजनेतून लाभ मिळतो पण त्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. सदर बँकेत नेहमीच सावळागोंधळ सुरू असते. या प्रकरणी वरिष्ठांनी विराम आणून बँकसेवा सुरळीत करावी, अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेनेचे उपजिल्हा समन्वयक मनोज चौबे, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखील कटारे, अरुण डांगरे, दीपक मलेवार, राजू ठाकूर, सतीश वाकरकर, रितेश शेंडे, निखील कुंभलकर सह खातेदार उपस्थित होते.