महाप्रजा बुद्ध विहारात माता रमाईस अभिवादन

51

महाप्रजा बुद्ध विहारात माता
रमाईस अभिवादन

महाप्रजा बुद्ध विहारात माता रमाईस अभिवादन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-तालुक्यातील मुरमाडी/सावरी च्या महाप्रज्ञा बुद्ध विहारात बहुजनांची आई , कष्टकरी महिलांचे प्रेरणास्थान रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुरेंद्र बनसोड , प्रमुख अतिथी डॉ. सुरेश खोब्रागडे , सुमन कान्हेकर , डॉ. रेवाराम खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. मान्यवरांतर्फे त्यागमुर्ती रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथिंनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येक स्त्रीने त्यागमूर्ती रमाईच्या आदर्श ठेऊन आपल्या पाल्यांना सुशिक्षित व सुसंस्कृत करण्यावर भर द्यावा. बुद्ध विहार हे समाजपरिवर्तनाचे केंद्र समजून संघटित होऊन सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक , आर्थिक , राजकिय स्तरावरील समस्यांचे समाधान बुद्ध विहारातून करावे. असे उपस्थितांना कळकळीचे आवाहन करून त्यागमूर्ती रमाईच्या कष्टमय जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा तिरपुडे , प्रास्ताविक डॉ. रेवाराम खोब्रागडे , आभार रामप्रसाद देशपांडे यांनी मानले. लक्ष्मण रंगारी , शालिक जांभूळकर , ललिता बडगे , शिला कोटांगले , आशिष गणवीर , विनय रामटेके , शर्मिला खंडारे , कमल गणवीर , सरिता कान्हेकर , लीला भिमटे , भूपेंद्र रामटेके , विठोबा कांबळे , आनंद जांभूळकर इत्यादींसह समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.