शिवराया विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यासह,परिवहनमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन..

61

शिवराया विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यासह,परिवहनमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन..

शिवराया विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यासह,परिवहनमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन..

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

*शाळा सुरू केल्यात मात्र ग्रामीण भागातून शहरात शिकायला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करा-विद्यार्थिमित्र नितीन सेलकर*

प्रतिनिधी/वर्धा
मागील दोन वर्षांपासून देशातच नाहीतर जगात कोरोनाने थैमान घातल्याने माणसांच्या आयुष्यातील जणू जीवनचक्रच थांबले होते,अशातच दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालय सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू होती मात्र कोरोनाची लाट ओसरली आणि हळूहळू बंद पडलेलं जीवनचक्र पूर्ववत होण्यास सुरुवात झाली अशातच, मागील तीन महिण्यापासून ग्रामीण भागातून शहराला जोडणारी जीवनवाहिनी “लालपरी” कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी बंद अवस्थेत आहे तर दुसरीकडे शाळा,महाविद्यालय सुरू करण्याचा कौतुकास्पद निर्णय शासनाने घेतला आहे परंतु “लालपरी” बंद असल्याने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी “पायपीट” करावी लागते आहे तर अनेक विद्यार्थ्यांना लालपरी नसल्याने व प्रवासाचा टप्पा लांबचा असल्याने शिक्षणापासून वंचीत राहावे लागते आहे करिता विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शासनांनी शाळा,महाविद्यालय सुरू केलेली आहे मात्र विद्यार्थ्यांना शैकक्षणिक स्थळी पोहचण्यासाठी खासगी अथवा शासकीय वाहनांची शाळा निहाय व्यवस्था करणे गरजेचे आहे ही बाब शिवराया विद्यार्थी संघटनेच्या लक्षात येताच विद्यार्थिमित्र नितीन वि.सेलकर संस्थापक,अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री,परिवहनमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन देत विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता वाहनांची व्यवस्था करावी ही विनंति मागणी पत्राद्वारे केली आहे…