एनसीएलटीला कोर्टाने मोहता मिलचे इलेक्ट्रिक कनेक्शन चालू करण्याची दिली परवानगी.
कामगारांच्या साखळी उपोषणाला व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या पाठपुराव्याला यश.
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट:- ०८ फेब्रुवारी २०२२
मोहता मिल हिंगणघाटच्या कामगारांचे तहसील कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरू असून, मोहता मिथा एन.सी.एल.टी मध्ये गेला असून कामगारांच्या मागण्या लक्षात घेता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी एन.सी.एल.टीचे मनीष गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे मोहता मिल चालू करण्या संदर्भात चर्चा केली असता इलेक्ट्रिकचे कनेक्शन चालू करण्याची परवानगी कोर्टाने दिल्यास आम्ही मिल चालू करू असे सांगितले व इलेक्ट्रिक चालू करण्याची परवानगी मिळताच एक महिन्याच्या आत मशीनचे मेन्टेनन्स करून मिल सुरू करून कामगारांना काम देऊ असे एन.सी.एल.टीचे महेशचंद्र गुप्ता यांनी दूरध्वनीवर त्यावेळी सांगितले होते.
एन.सी.एल.टी (नॅशनल कंपनी लाँ ट्राइब्युनलच्या) आदेशानुसार मोहता मिल ३० ऑगस्ट २०२१ पासून एन.सी.एल.टी मध्ये गेली आहे. कोर्टाने महेशचंद्र गुप्ता यांना मोहता मिल प्रशासन अध्यक्ष बनवला असून तेच आता मिल चालवणार आहे .
महेशचंद्र गुप्ता यांनी कोर्टाला वीज पुरवठा देण्यासंबंधी परवानगी मागितली होती परंतु इलेक्ट्रिक डिपार्टमेंटने त्यासंबंधी विरोध दर्शवून त्यावर त्यांनी सांगितले होते की जुने मिल व्यवस्थापक मोहता यांच्यापासून १ कोटी ४० लाख रुपये थकीत रक्कम इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला घ्यायचे आहे. त्यावर कोर्टाने पुढील सुनवाई १६ फेब्रुवारी २०२२ला दिली होती परंतु कामगारांचे तहसील कार्यालया समोरील अनेक दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी वारंवार संपर्क राहुल केलेला पाठपुरावा त्यामुळे महेशचंद्र गुप्ता यांनी अर्जाद्वारे तुरंत सुनवाईची मागणी केली जी २७ जानेवारी २०२२ ला झाली या कारणाने २७ जानेवारी ला गुप्ता यांनी समभाषणा करतेवेळी आपली बाजू मांडते वेळी कोर्टाला म्हटले की इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा जो काही दावा आहे तो आम्ही आमच्या क्लेम मध्ये समाविष्ट केला आहे आणि मोहता मिल जेव्हा विकल्या जाईल तेव्हा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे पैसे त्वरित देण्यात येईल यावर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या वकिलाने आपल्या ऑब्जेक्शन वापस घेतले आणि वीस देण्यास काही हरकत नाही असे म्हटले यावर एन.सी.एल.टीने आपल्या आदेश मध्ये तुरंत विज देण्यास म्हंटले आहे.
२९ जानेवारीला पासून साखळी उपोषण सुरू असून पहिल्या दिवशी रवींद्र गोडसेलवार, रणजित ठाकूर, दुर्गादास मानकर ३० जानेवारीला एकनाथ डेकाटे, संजय पुनवटकर, द्वारकादास जोशी ३१ जानेवारीला प्रवीण झाडे,अशोक शेंडे, रवी सहारे ०१ फेब्रुवारीला विलास ढोबळे ,दशरथ वैरागडे, मारुती कोहपरे ०२ फेब्रुवारीला चंद्रशेखर दरबेसवार,वसंता मानकर, गजानन इंडोडे ०३ फेब्रुवारीला वैरागडे वैरागडे दिगंबर पाटील,केशव मुडे, चेताआनंद माने ०४ फेब्रुवारीला ज्ञानेश्वर हेडाऊ,दिनकर तेल्हांडे, सुनील महाले ०५ फेब्रुवारीला गजानन डोंगरे,दिगंबर रेवतकर, शब्बीर मिर्झा ०६ फेब्रुवारीला दिलीप चौधरी, दिलीप कोराते, ज्ञानेश्वर वरभे ०७ फेब्रुवारीला देवराव साबळे,सुनील राऊत, प्रकाश बुटले ०८ फेब्रुवारी प्रभाकर शेंडे,रमेश मांदाडे, दीपक परदे ०९ फेब्रुवारीला राजेंद्र कोसुरकर, हनुमान यादव,भारत बोधिले या सर्वांनी साखळी उपोषणा केले.
मिल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व या साखळी उपोषणाला यश आले असून पूर्णतः मिल चालू होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे असे त्यावेळी सांगण्यात आले. उपोषणकरते कामगार ज्ञानेश्वर हेडाऊ,नाना पिसे,रंजीत सिंग ठाकूर, महेश वकील,प्रवीण चौधरी, पंजाबराव लेवडे, प्रवीण झाडे, द्वारकादास जोशी,धर्मराज बेलखेडे, रवींद्र गोडसेलवार, प्रशांत डोके,विनोद ठाकरे,श्रीराम पिसे,संजय गंधेवार, रामेश्वर लाकडे, गजानन डोंगरे,प्रभाकर शेंडे,रामनारायण पांडे,शेखनसीर शेखदादामिया, महेश दुबे,दिलीप चौधरी,प्रकाश बुटले,राजकुमार खोब्रागडे,अजय देवढे, टीकमचंद चव्हाण, राजेंद्र कुसुरकर, राजू वैरागडे,शब्बीर मिर्झा, मोहन पोकले,प्रल्हाद मेसरे,ज्ञानेश्वर अंद्रस्कर,दीपक पर्धे, गणेश निमजे, संजय सायंकार,राजू नरड, दशरथ वैरागडे,देवराव साबळे,शंकर राडे,रमेश खरडे, विनोद दांडेकर, लीलाधर शिवणकर,विनोद ढगे, बबन बेलखेडे,देविदास लोणकर, मोरेश्वर लोणकर,श्रीराम सातघरे इत्यादी सर्व कामगारांनी एन.सी.एल.टीचे आभार मानले आहे.