सिद्धांत ९ फेब्रुवारी, मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल रात्री आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्याकडून उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राचे फोटो टाकले. या पत्रामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात सहभागी होण्यासाठी माझ्यावर काही व्यक्तींकडून दबाव टाकला गेला असल्याचा खळबळजनक खुलासा संजय राऊत यांनी केला. पत्रामध्ये त्यांनी भाजपकडून ईडी सारख्या संस्थांचा त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात सरकार पाडण्यात सहभागी होण्याची धमकी संजय राऊतांनी पत्रात एक खळबळजनक खुलासा करत म्हटले आहे कि, महिन्याभरापूर्वी मला काही व्यक्ती येऊन भेटल्या ज्यांनी मला शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात सहभागी होण्यास सांगितले. मी त्यांना साफ नकार दिल्यानंतर त्यांनी मला खोट्या घोटाळ्यांमध्ये अडकवून अटक कर्णयची धमकी दिली. तसेच महाराष्ट्रातील इतर दोन-तीन मोठ्या नेत्यांना पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात टाकून महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक घेण्याची धमकी मला दिली गेली. अलिबाग जमीन घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न संजय राऊत पुढे म्हणतात कि, अलिबागमध्ये माझ्या मालकीची १ एकरची जमीन आहे जी मी १७ वर्षांपूर्वी रीतसर कागदपत्रांसह खरेदी केली होती. तसेच २०१२ मध्ये मी काही जमीन खरेदी केली होती. ह्याबद्दचे सगळी माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये जमा आहेत. इतकी वर्षे ह्या व्यवहाराबाबतीत कोणतीही शंका उपस्थिती केली गेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मूळ मालकांना त्रास देण्यास सुरुरवात केली आहे. जमिनीच्या ठरलेल्या रकमेपेक्षा मी त्यांना जास्त पैसे रोख रकमेच्या स्वरूपात दिले असल्याचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीच्या मूळ मालकांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन त्यांचा माझ्याविरोधात खोटे आरोप करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचा संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात हस्तक्षेप संजय राऊत यांच्या मुलीचा लग्नसोहळा गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला पार पडला होता. ह्या सोहळ्यात डेकोरेशन आणि इतर कामे केलेल्या व्यावसायिकांना ईडी विनाकारण त्रास असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. माझ्याकडून त्यांना ५० लाख रोख रक्कमेच्या स्वरूपात दिले असल्याचा खोटा आरोप लावला जात असून, व्यावसायिकांनी ह्यास साफ नकार दिला आहे. तरीही ईडीकडून ह्या व्यावसायिकांची सतत चौकशी होत असून, ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना विनाकारण त्रास होत आहे. ईडी टाकतेय माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी २८ लोकांवर दबाव. ईडीकडून कोणत्याही पुराव्याविना २८ जणांना ताब्यात घेतले असून, अधिकारी तासनतास विनाकारण त्यांची चौकशी करत आहेत. त्यांना माझ्याकडून रोख रक्कम दिली गेली असल्याचे जबरदस्तीने त्यांच्याकडून वदवून घेतले जात आहे. हे सारे मला खोट्या घोटाळ्यात अडकवण्यासाठी करण्यात येत आहे. संजय राऊतांचे उपराष्ट्रपतींना आवाहन पत्राचा शेवट करताना संजय राऊत म्हणतात कि, मी घाबरलेलो नाही. यापूर्वी जसे जनतेचे प्रश्न मी सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर मांडत होतो, त्यामध्ये मी कदापि मागे हटणार नाही. परंतु सत्ताधारी पक्षातर्फे ईडीसारख्या सरकारी संस्थांचा माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना आणि निर्दोष व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी होत असलेला वापर लोकशाहीसाठी धोकादायक आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करून आखण्यात येणाऱ्या षडयंत्रात दोषी असलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याकडे संजय राऊत आवाहन करतात.

ईडी टाकतेय माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी २८ लोकांवर दबाव, संजय राऊतांचा खबळजनक आरोप

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यास मदत करा अन्यथा…, संजय राऊतांचे उपराष्ट्रपतींना खळबळजनक पत्र

सिद्धांत
९ फेब्रुवारी, मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल रात्री आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्याकडून उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राचे फोटो टाकले. या पत्रामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात सहभागी होण्यासाठी माझ्यावर काही व्यक्तींकडून दबाव टाकला गेला असल्याचा खळबळजनक खुलासा संजय राऊत यांनी केला. पत्रामध्ये त्यांनी भाजपकडून ईडी सारख्या संस्थांचा त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात सरकार पाडण्यात सहभागी होण्याची धमकी
संजय राऊतांनी पत्रात एक खळबळजनक खुलासा करत म्हटले आहे कि, महिन्याभरापूर्वी मला काही व्यक्ती येऊन भेटल्या ज्यांनी मला शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात सहभागी होण्यास सांगितले. मी त्यांना साफ नकार दिल्यानंतर त्यांनी मला खोट्या घोटाळ्यांमध्ये अडकवून अटक करण्याची धमकी दिली. तसेच महाराष्ट्रातील इतर दोन-तीन मोठ्या नेत्यांना पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात टाकून महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक घेण्याची धमकी मला दिली गेली.

अलिबाग जमीन घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न
संजय राऊत पुढे म्हणतात कि, अलिबागमध्ये माझ्या मालकीची १ एकरची जमीन आहे जी मी १७ वर्षांपूर्वी रीतसर कागदपत्रांसह खरेदी केली होती. तसेच २०१२ मध्ये मी काही जमीन खरेदी केली होती. ह्याबद्दलची सगळी माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये जमा आहे. इतकी वर्षे ह्या व्यवहाराबाबतीत कोणतीही शंका उपस्थिती केली गेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मूळ मालकांना त्रास देण्यास सुरुरवात केली आहे. जमिनीच्या ठरलेल्या रकमेपेक्षा मी त्यांना जास्त पैसे रोख रकमेच्या स्वरूपात दिले असल्याचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीच्या मूळ मालकांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर माझ्याविरोधात खोटे आरोप करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांचा संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात हस्तक्षेप
संजय राऊत यांच्या मुलीचा लग्नसोहळा गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला पार पडला होता. ह्या सोहळ्यात डेकोरेशन आणि इतर कामे केलेल्या व्यावसायिकांना ईडी विनाकारण त्रास असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. माझ्याकडून त्यांना ५० लाख रोख रक्कमेच्या स्वरूपात दिले असल्याचा खोटा आरोप लावला जात असून, व्यावसायिकांनी ह्यास साफ नकार दिला आहे. तरीही ईडीकडून ह्या व्यावसायिकांची सतत चौकशी होत असून, ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना विनाकारण त्रास होत आहे.

 

हे आपण वाचलंत का?

 

ईडी टाकतेय माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी २८ लोकांवर दबाव.
ईडीकडून कोणत्याही पुराव्याविना २८ जणांना ताब्यात घेतले असून, अधिकारी तासनतास विनाकारण त्यांची चौकशी करत आहेत. त्यांना माझ्याकडून रोख रक्कम दिली गेली असल्याचे जबरदस्तीने त्यांच्याकडून वदवून घेतले जात आहे. हे सारे मला खोट्या घोटाळ्यात अडकवण्यासाठी करण्यात येत आहे.

संजय राऊतांचे उपराष्ट्रपतींना आवाहन
पत्राचा शेवट करताना संजय राऊत म्हणतात कि, मी घाबरलेलो नाही. यापूर्वी जसे जनतेचे प्रश्न मी सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर मांडत होतो, त्यामध्ये मी कदापि मागे हटणार नाही. परंतु सत्ताधारी पक्षातर्फे ईडीसारख्या सरकारी संस्थांचा माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना आणि निर्दोष व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी होत असलेला वापर लोकशाहीसाठी धोकादायक आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करून आखण्यात येणाऱ्या षडयंत्रात दोषी असलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याकडे संजय राऊत यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here