घुग्घूस शहर काँग्रेसच्या मागणीला यश
वेकोलीतर्फे दुरुस्ती व स्वच्छतेच्या कार्यास सुरूवात
🖋️ साहिल सैय्यद…
तालुका प्रतिनिधि घुग्घूस :
📲 9307948197
घुग्घूस : शहरातील गांधी नगर,सुभाष नगर या वेकोलीच्या कॉलोनीतील धोकादायक इमारती दुरुस्ती,इमारतीवर उगवलेल्या झाडा – झुडपांची स्वच्छतेसह विविध समस्यांच्या निवारणासाठी वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक आभाषचंद्र सिंग यांची भेट घेत घुग्घुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी , कामगार नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांनी निवेदनातुन मागणी केली होती
सदर मागणीची मुख्य महाप्रबंधक यांनी तातळीची दखल घेत सदर कॉलोनीत इमारत दुरूस्तीच्या स्वच्छतेच्या कामास सुरुवात झाली असून लवकरच पाण्यासाठी पाईपलाईन व अन्य कामास ही सुरुवात करण्यात येणार आहे.
सदर शिष्टमंडळात विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी, सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.