मेढे येथे दारू विक्रेत्यावर पोलिसांची धाड;दोघांवर कारवाई
कायमच्या दारु बंदीसाठी ग्रामस्थांची मागणी
✍🏻किशोर पितळे✍🏻
तळा तालुका प्रतिनिधी
९०२८५५८५२९
तळा :- तळा दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यातील मेढे येथे गावठी दारू तयार करण्याचा व्यवसाय गेले अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.तळा पोलिसांना या हद्दीत दारू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी अचानक मेढा आदिवासी वाडीत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्या ठिकाणी तपास करत असताना दोन घरांमध्ये अवैध स्वरूपात गावठी दारू मिळून आली, पोलिसांनी कारवाई न थांबवता जांगलभगाचा देखील जवळपास दोन ते तीन तास चालत तपास केला. अथक परिश्रमानंतर पोलीस पथकाला चार ते पाच रबरी ट्यूब मध्ये आणि प्लास्टिक ड्रम मध्ये जवळपास १५० लिटर गावठी दारू आढळून आली. ही गावठी दारू तळा पोलिसांनी जागेवरच नष्ट केली आणि दोन घरांमध्ये अवैद्य गावठी दारू मिळून आल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई केली.
मेढा आंबटशौकीन लोकांचा अड्डाच झाला आहे या गावठी दारुच्या व्यसनामुळे मेढे आदिवासी वाडी येथील अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले आहेत अनेक महिला तरुणपणीच विधवा झाल्या असुन घरात करता पुरुष नसल्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे दारुच्या व्यसनाधीनते मुळे दररोज भांडण तंटे यामुळे व्यसन नसलेल्या नागरिकांना रोजचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे पोलीसांनी एकदा धाड टाकायची पुन्हा काही दिवसांनी दारु सुरु हे वर्षानुवर्षे सुरुच आहे दारू कायमची बंद करण्याची मागणी येथील महिला वर्ग आणि ग्रामस्थ यांनी केली असून या कारवाईमुळे सर्व महिला वर्गाने सहाय्यक पोलीस निरक्षक गणेश कराड यांचे आभार मानले आहेत.