उमरेड येथील बायपास चौकात भीषण अपघात एक जागीच ठार आणि एक गंभीर जखमी.

108

उमरेड येथील बायपास चौकात भीषण अपघात एक जागीच ठार आणि एक गंभीर जखमी.

त्रिशा राऊत नागपुर जिला ग्रामीण प्रतिनिधि.मो
9096817953

उमरेड . उमरेड गडचिरोली नागपूर महामार्गारील -उमरेड बाय पास चौक परिसरात मोठा ट्रेलर व दुचाकीचा अपघातात एका युवकाचा मृत्यु झाल्याची दुखद घटना ९ फरवरी रविवारला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली या अपघातामुळे परिसरात एकच गर्दी यावेळी पहावयास मिळाली आहे. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सदर ट्रेलर हा या वळणावर रस्ता क्रास करीत असतांना दुचाकीला जोरदार धडक लागली. यात युवकाला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला मृतक हा अंदाजे २५ वर्ष वयोगटातील असावा
मृतकाची अजूनही ओळख पटलेली नाही. सदर घटनेचा तपास उमरेड पोलिस करीत आहे.