मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.
जाणीव समृद्ध करणारी शक्ती म्हणजे स्त्री : डॉ उमेश तुळसकर
✒प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒
हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा सपना जयस्वाल व ज्येष्ठ शिक्षकेत्तर कर्मचारी ताराबाई जायदे, वर्षा देहारी सोबतच किरण फुलमाळी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रसंगी प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी समाजाच्या बदलत्या संदर्भानुसार स्वतःला चपखलपणे बदलून कुटुंबासह समाजाची जाणीव समृद्ध करणारी शक्ती म्हणजे स्त्री च आहे असे प्रतिपादन केले, प्रा सपना जयस्वाल यांनी शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला तर प्रा अश्विनी चौधरी प्रा वैशाली तडस प्रा भाग्यश्री साबळे यांनी आपापले अनुभव कथन केले, याप्रसंगी सर्वांच्या वतीने शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अभय दांडेकर यांनी तर आभार प्रा अजय बिरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिकांनी सहकार्य केले