साथ फाऊंडेशन तर्फे ऑनलाईन प्रणालीने जागतिक महिला दिनाचे आयोजन.

71

साथ फाऊंडेशन तर्फे ऑनलाईन प्रणालीने जागतिक महिला दिनाचे आयोजन.

राजस्थान च्या एकदिवसीय मुख्यमंत्री होत्या प्रमुख वक्त्या.

Saath Foundation organizes International Women's Day through online system.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒

बुटीबोरी :- 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण जगात साजरा केला जातो. या वर्षी कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव बघता साथ फाऊंडेशन च्या माध्यमातून ऑनलाइन प्रणाली द्वारे महिला दिनाचे औचित्य साधुन संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला राजस्थान राज्याचे एकदिवसीय मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या महाराष्ट्र मधील परभणीच्या कुमारी मंजुश्री सुरेश घोणे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. मंजुश्री राष्ट्रीय पातळीवर बुद्धीबळ खेळाडू आहेत. तिला ऑल इंडिया फेडरेशनच्या खुले बुद्धीबळ स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले आहेत. परळी बैधनाथ महाविद्यालयाला वादविवाद स्पर्धेत तब्बल 33 वर्षानंतर तिनी चांदीची माळ हा पुरस्कार मिळवून दिला. या अगोदर हा पुरस्कार कै. प्रमोद महाजन यांनी मिळविलेला होता. त्यामुळे मंजुश्री ला परळी बैधनाथ महाविद्यालयाने सर्वगुण संपन्न या पुरस्काराने सन्मानित केले.

चर्चासत्र मध्ये मंजुश्री नि आत्मनिर्भर महिला, महिलांची सुरक्षितता, बालविवाह, स्त्री पुरूष समानता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ऑनलाइन प्रणाली द्वारे चार हजार लोकांनी उपस्थिती दर्शविलेली होती. कार्यक्रमाच्या शेवटी साथ फाऊंडेशन चे संस्थापक प्रयाग डोंगरे यांनी मंजुश्री ला भगवतगीता देऊन सन्मानित केले.