Shri Sai Seva Sankalp Pratishthan Chandrapur celebrates Women's Day in a different way.
Shri Sai Seva Sankalp Pratishthan Chandrapur celebrates Women's Day in a different way.

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे महिला दिन’ वेगळ्या पद्धतीने साजरा.

 Shri Sai Seva Sankalp Pratishthan Chandrapur celebrates Women's Day in a different way.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून चंद्रपुरातील नामांकित समाजसेवक यांच्या नावाने ती त्यांच्या परिचयातील निराधार स्त्रीला सहकार्याची व मदतीची गरज आहे. असा मॅसेज प्रतिष्ठानच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर आला सादर मॅसेज ची पडताणी केल्यावर आढळले की अय्यप्पा मंदिर परिसरातील सौ. शिल्पा काळे यांना खरज परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीला उदार निर्वाह करणे कठीण होत आहे. याच अनुषंगाने प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमाव्दारे दरवर्षी महिला दिन साजरा करण्यात येतो. या वर्षी बाबींना बाजूला सारून हारफुल सत्कार याला वगळून सौ. शिल्पा काळे यांना प्रतिष्ठान तर्फे महिला दिनाच्या दिवशी या ताईंना सक्षम करणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता प्रतिष्ठान तर्फे नवीन शिलाई मशीन देण्यात आली व त्याकरिता लागणारे रॉ मटेरियल प्रतिष्ठान पुरविले.

सदर शिलाई मशीन महिला दिनाच्या अनुषंगाने ताईच्या राहत्या घरी प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीन सुपूर्द करण्यात आली सरद कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गाटकीने, उपाध्यक्ष सौ. ज्योती शनवारे, सहसचिव विनोद गोवरदिपे, कोषाध्याक्ष प्रमोद वरभे, सदस्य प्रतीक लाड, भूषण कल्लूरवार, श्वेता कंदीकुरवार, माधुरी संगीडवार, नेहा शंकर, भागवत खटी, भास्कर डांगे, धनपाल शेणवारे यांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here