पत्नीने पतीचा पोटात भोकसला चाकू. पतीची केली हत्या. विरार मधिल घटना.

52

पत्नीने पतीचा पोटात भोकसला चाकू. पतीची केली हत्या. विरार मधिल घटना.

The wife stabbed her husband in the stomach. Husband's murder. Incident in Virar.

राज शिर्के प्रतीनिधी.
मुंबई, दि.9मार्च:- विरारमध्ये राहणारा एका पत्नीने आपल्या स्वता:च्या पतीची चाकुने वार करुन हत्या केल्याची खळखळजनक घटना घडली आहे. या महिलेला विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

विरार येथील राहणारा लोकेश असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. पत्नी नेहाने लोकेशच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेहाला ताब्यात घेतलं आहे.

लोकेश आणि नेहाचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 7 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र लोकेश हा दारू पिऊन मारहाण करत असल्याने नेहा विभक्त झाली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी पुन्हा एकत्र आले होते. रविवारी रात्री एकच्या सुमारास लोकेश दारू पिऊन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद कडाक्याचं भांडण झालं. यानंतर रागाच्या भरात नेहाने लोकेशची हत्या केली, अशी माहिती विरार पोलिसांनी दिली आहे.

विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहे.