Two brothers fell in love with the same girl, both of them committed suicide by jumping under the train.
Two brothers fell in love with the same girl, both of them committed suicide by jumping under the train.

एकाच मुलीवर जडले दोन भावाचे प्रेम,  दोन्ही भावांनी रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या.

 Two brothers fell in love with the same girl, both of them committed suicide by jumping under the train.
कोटा:- मुलगी एक पण तिच्यावर दोघा चुलत भावाचे प्रेम. या प्रेम त्रीकोनामुळे दोन्ही चुलत भावाने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घडली आहे. चालत्या रेल्वेसमोर उडी मारून दोन भावांनी जीवन संपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज गुर्जर वय 23 वर्ष आणि महेंद्र गुर्जर वय 23 वर्षे अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघे दबलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी आहेत. देवराज आणि महेंद्र एकाच मुलीच्या प्रेमात होते. त्यांच्या हातावर ‘आशा’ नाव आढळून आलं. दोघांचे मृतदेह दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे रुळांजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही भावांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आम्ही उचलणार असलेल्या पावलासाठी आमच्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही, असं दोघांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. ‘आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. मी उचलेल्या पावलासाठी त्याला आणि त्यानं उचलेल्या पावलासाठी मला जबाबदार धरू नये,’ असं आवाहन त्यांनी व्हिडीओतून कुटुंबीयांना केलं आहे.

आमच्या मृत्यूनंतर कुटुंबानं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन भावंडांनी केलं आहे. मुलीसाठी योग्य जोडीदार शोधा आणि तिचं लग्न लावून द्या, असंदेखील दोन भावंडांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम 174 खाली गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दोन्ही भावांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here