स्वागत महिला ग्राम संघ तर्फे पिंपळगाव येथे जागतिक महिला दिवस साजरा.

51

स्वागत महिला ग्राम संघ तर्फे पिंपळगाव येथे जागतिक महिला दिवस साजरा.

Welcome International Women's Day Celebration at Pimpalgaon by Mahila Gram Sangh.
साहिल संजय महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ/राळेगाव,दि. 8मार्च:-  राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथून जवळच असलेल गाव पिंपळगाव येथे जागतिक महिला दिवस हा उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहणे यांनी जागतील महिला दिना निमित्त आपले विचार व्यक्त केले.

Welcome International Women's Day Celebration at Pimpalgaon by Mahila Gram Sangh.

आज महिला सर्व क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आज आपला परीवाराची जबाबदारी सांभाळत महिला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक सर्व क्षेत्रात आपल्या जिद्दीने, कष्टाने आपल नाव कमवत आहे. आज देशातील प्रगती मध्ये स्त्रीचा खुप मोठा वाटा आहे. पण आज देशात आणि राज्यात महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. हे प्रगतीशिल भारताचे मोठे दुर्देव आहे. असे मत प्रमुख पाहुणे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिवसा निमीत्त गावातील अनेक पाहूण्यानी यावर भाषण दिले. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव येथील ग्राम संघ सचिव शंकर घडले, आय.सी.आर.पी. वनिता धोटे, कृषी सखी मंगला गुजरकर, पशु सखी अनिता महाजन, कोषाध्यक्ष शुभांगी उजवणे, अंगणवाडी सेविका कल्पना महाकुलकर व गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होता. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून जागतिक महिला दिवस हा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला.