भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

भंडारा :- सविस्तर वृत्त असे आहे की, भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे, मंगळवारी ६५१ व्यक्तींची चाचणी केली असता दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले, त्यामुळे जिल्यात आता ८ सक्रिय रुग्ण आहे. सक्रिय असलेल्या ८ रुग्ण आता घरीच अलगीकरनात आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ हजार ७४७ आहे. तर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६७ हजार ८९७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३१% आहे.आतापर्यंत ०५ लाख ७८ हजार १७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.त्यात ६७ हजार ७९७ व्यक्ती कोरोना पोझिटीव्ह आढळून आले.
कोरोना पॉझिटीव्ह अलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ०१, मोहाडी ००, तुमसर ००, पवनी ००, लाखनी ०१, साकोली ००, व लाखांदूर तालुक्यातील ०० व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह मृतांची संख्या एकूण ११४२ आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हा अधिकारी संदीप कदम शाहेब यांनी संपुर्ण जिल्ह्यामध्ये दिले आहेत.