सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड पाचोरा येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचेआयोजन.

सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड पाचोरा येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचेआयोजन.

सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड पाचोरा येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचेआयोजन.

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602

पाचोरा : -8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड, पाचोरा येथे महिला सशक्तिकरण, लेक वाचवा, अशा विषयांवर वादविवाद स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन व क्विज कॉम्पिटिशन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार कैलास सावळे सर यांच्या पत्नी माननीय चावरे मॅडम, सुनील नेत्रालय चे संचालक डॉ. अर्चना पाटील या उपस्थित होत्या. चावडे मॅडम यांनी महिला सशक्तिकरण व महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे या संदर्भात तरुणींशी संवाद साधला. पोतदार मॅडमनी गीत गायन करून महिलांचा आत्मविश्वास वाढवला. त्याप्रसंगी संस्थाचालक किशोर पोतदार सर कॉलेजचे प्राचार्य डॉ.मनोज पाटील सर प्रा.निखिल सोनवणे, प्रा.सतीश बोरसे, प्रा.स्वीटी तिवारी,ज्योत्स्ना पाटील, कल्याणी कुवर,करुणा जोशी,उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण करून करण्यात आली व मान्यवरांचे आभार श्री प्रा.जयश्री बोरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here