जागतिक महिला दिन सोहळा संपन्न"

जागतिक महिला दिन सोहळा संपन्न”

जागतिक महिला दिन सोहळा संपन्न"

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – सायन कोळीवाडा प्रतिक्षा नगर मधील अल्मेडा कंपाऊंड चे *”महाबोधी बुध्द विहार”* येथे महिलांना त्यांच्या हक्कांसाठी जागृत करणा-या आणि घरेलू हिंसाचार विरोधी झगडणाऱ्या *”स्नेहा फाऊंडेशन”* च्या वतीने *’जागतिक महिला दिन सोहळा”* आयोजित करण्यात आला होता.
ह्याप्रसंगी महिलांना वेळोवेळी मदत करणारे आम्रपाली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आयु. कांबळे गुरुजी यांनी महिलांना घरातील जन्म झाल्यापासून लग्नानंतर चे आयुष्य असा विविध उदाहरणातून काल, आज आणि उद्या वास्तविक जीवनात महिलांची प्रगतीची माहिती दिली तर स्थानिक वडाळा टी. टी. चे महिला उपनिरीक्षक खंडागळे मॅडम ने सुरक्षेसंदर्भात पोलिस खात्याचे महिलांविषयी असणारे कायदे समजावून सांगितले तर निर्भया पथकाला संरक्षणासाठी प्रशिक्षण देणारे महेश सर यांनी आपल्या प्रशिक्षीत विद्यार्थ्यांव्दारे अचानक होणा-या हल्ल्यापासून स्वतः चे रक्षण कसे करावे? याची रोमांचकारी प्रात्यक्षिके सादर केली.
तसेच, स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. तर काही महिलांनी भाषणातून, गाण्यातून, नृत्यातून आपले कौशल्य दाखवून महिला दिन साजरा केला.
ह्या सोहळ्यासाठी *”स्नेहा फाऊंडेशन”* च्या प्रमुख प्रतिनिधी दिपाली केदारे, पुजा पाटणकर, सुनिता जाधव, वंदना शिंदे, जयप्रकाश जैस्वाल यांच्या सह किर्ती मोहिते यांनी संयोजन केले होते.
शेवटी समारोप करताना उपस्थित मान्यवरांना वृक्ष वाटप करून सन्मानित केले. सांस्कृतिक कार्यक्रमाव्दारे कौशल्य सादर करणा-या सर्व कलाकारांचे भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महाबोधी बुध्द विहाराचे अध्यक्ष सुनील गायकवाड, सरचिटणीस संदिप कांबळे आणि स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा दिपक कांबळे यांचे जाहीर आभार मानून *जागतिक महिला दिन* सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here