जागतिक महिला दिनानिमित्त बाबुपेठ येथे महीला बचत गटातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त बाबुपेठ येथे महीला बचत गटातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त बाबुपेठ येथे महीला बचत गटातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

✍सौ .हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

चंद्रपूर : -जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ येथे महीला बचत गटातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य, आईसोबत नृत्य तसेच फॅशन शो अशा विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
दैनदिन कामाच्या व्यापामुळे अनेक माता – भगिनींना स्वतःला तसेच त्यांच्या कलागुणांना वेळ देता येत नाही.मात्र हा कार्यक्रम महीला बचत गटांनीच आयोजित केल्यामुळे मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला, वेळोवेळी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर महिलांना देखील त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी संधी मिळत असते.
आज जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा दिल्या,आयोजकांचे आभार मानत त्यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
येणारा काळ हा आपलाच आहे त्यासाठी आपल्या सर्वांना स्वतःला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे.आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य,प्रशासन आणि सर्वच क्षेत्रात आज महिलांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा बोलबाला आहे. यामध्ये आपण कुठेही मागे पडता कामा नये.वेळोवेळी आपल्या कौशल्यात आणि ज्ञानात भर घाला असे आवाहन या निमीत्ताने केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उप अधीक्षक सौ.राधिका फडके यांच्या हस्ते झाले तर या कार्यक्रमाला कायदेविषयक सल्लागार डॉ.अंजली साळवे – विटणकर,नायब तहसीलदार प्रितीताई डूडूलकर,पुरवठा निरीक्षक उत्कर्षा पाटील, रेडिओलॉजिस्ट प्रेरणा कोलते, समजासेविका डॉ.विद्याताई बांगडे,शिक्षिका अनिता बोबडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here