शिंदाड येथे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा : – शिंदाड ता पाचोरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे सरपंच ज्ञानेश्वर तांबे उपसरपंच नरेंद्र पाटील डॉक्टर मयुर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना ताई पाटील वत्सला धनगर लक्ष्मीबाई न्हावी पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले करण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीतर्फे महिलांची मोफत हिमोग्लोबिन कावीळ व थायरॉईड तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी 85 महिलांची तपासणी करण्यात आली महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ विलास पाटील मिराबाई परदेशी श्रीराम धनगर विजय पाटील परदेशी बापू पाटील विनोद तडवी राजेंद्र परदेशी तकदीर तडवी तसेच गुलफाम शेख राहुल पाटील तसेच अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर प्रल्हाद शिंपी रवींद्र पाटील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .