थोर महात्म्यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याची गरज प्रा. सुचिता खनके यांचे माहिला दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

थोर महात्म्यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याची गरज

प्रा. सुचिता खनके यांचे माहिला दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

थोर महात्म्यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याची गरज प्रा. सुचिता खनके यांचे माहिला दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

✍सौ .हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपूर :- भारतीय संस्कृतीला थोर साधू संत महात्म्यांच्या विचाराचा वारसा लाभला आहे. त्याचा विसर पडता कामा नये. त्याचे जतन करून, तो वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे मत प्रा. सुचिता खनके यांनी व्यक्त केले आहेत. दि.८ मार्च रोजी महिला दिवसाच्या निमित्याने मोहसिनभाई जव्हेरी कन्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात थोर महात्म्यांवर आधारित वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दि ८ मार्च रोजी महिला दिवसाच्या निमित्याने मोहसिनभाई जव्हेरी कन्या महाविद्यालयात थोर महात्म्यांची वेशभूषा स्पर्धा, प्रश्न मंजुषा आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्त्री शिक्षण आणि स्त्रियांवरील होणारे अत्याचाराला आळा कसा बसेल या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या आयोजित कार्यक्रमात बहुसंख्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रा. सुचिता खनके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सारिकाताई निखाडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. विणा झाडे, प्रा. रुबिणा खान, प्रा.रेहाना शेख, प्रा. सुनिता चौधरी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेहाना शेख यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सुनिता चौधरी यांनी केले.